पिंपरी : दिवसभरात हरकतींचा अक्षरश: पाऊस | पुढारी

पिंपरी : दिवसभरात हरकतींचा अक्षरश: पाऊस

प्रभागरचनेबाबत एकाच दिवसात प्राप्त झाल्या विक्रमी 501 हरकती

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्यावर तब्बल 501 हरकती बुधवारी (दि. 9) एका दिवसात पालिकेच्या निवडणूक विभागास प्राप्त झाल्या आहेत.

ही संख्या पाहता गुरुवार (दि. 10), शुक्रवार (दि. 11) आणि सोमवार (दि. 14) या तीन दिवसांत विक्रमी संख्येने अर्ज येण्याची दाट शक्यता आहे. हरकतींचा हा पाऊस लक्षात घेता प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

एसबीआय बँकेच्या एटीएम मशीनला आग, मशीन जळून खाक

त्रिसदस्यीय प्रभागरचनेनुसार एकूण 46 प्रभागांचा प्रारूप आराखडा मंगळवारी (दि.1) प्रसिद्ध करण्यात आला. चार सदस्यीय प्रभागपद्धती बदलून तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीची नव रचना आणि 128 चे वाढून 139 नगरसेवक झाल्याने पूर्वीचे सर्वच्या सर्व प्रभाग कमी अधिक प्रमाणात फुटले आहेत.

विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागाची मोडतोड झाल्याने हक्काचे मतदार दुसर्‍या प्रभागात समाविष्ट झाले आहेत.सुरुवातीच्या चार दिवसांत एकूण 12 हरकती निवडणूक विभागाला प्राप्त झाल्या. मंगळवारी (दि.8) 65 हरकती जमा झाल्या.

बिबट्याच्या कातडी तस्करीचा नाशिकच केंद्रबिंदू ; शहापूर वनविभागाचा संशय

बुधवारी विक्रमी 501 हरकती जमा झाल्या आहेत. त्यामध्ये विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सार्वजनिक गणेश मंडळ व स्वयंसेवी संघटनेचे अध्यक्ष यांचा भरणा आहे.

हरकतींमध्ये रेल्वेमार्ग, रस्ते, नाले ओलांडून, एकसंध वस्ती, सोसायटी, चाळ, कॉलनी तोडल्याबाबतचे आक्षेप आहेत. बहुतांश इच्छाकांकडून सोयीचा प्रभाग न झाल्याने हरकती नोंदवल्या गेल्या आहेत.

कॅप्‍टन रोहित भडकला..चहल पळाला..!

फेबु्रवारी 2017 प्रमाणे प्रभाग असावा, अशी मागणी काहींनी केली आहे. तसेच, काहींनी प्रभागास झोपडपट्टी जोडण्याबद्दल किंवा न जोडल्याबद्दल हरकत नोंदविली आहे. तर, अनेकांचा मसुदा एकसारखा असून, केवळ लेटरहेड किंवा नाव बदलण्यात आले आहे.

हरकतींची सध्याचा पाहता पुढील तीन दिवसांत विक्रमी संख्येने हरकती नोंदविली जातील, असे स्पष्ट होत आहे. तसेच, काही जणांनी न्यायालयात दाद मागण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

अबब! ह्युंदाई आणि कियाच्या ५ लाख गाड्या परत मागवल्या, वाहनांत मोठी त्रुटी

परिणामी, निवडणूक विभागाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या सोमवारी (दि.14) दुपारी तीनपर्यंत प्राप्त होणार्‍या या सर्व हरकतींवर 25 फेबु्रवारीला एका दिवसांत सुनावणी होणार आहे.

एकसारख्या हरकतींवर ठरावीक नागरिकांसमोर सुनावणी

प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना प्राप्त होत आहेत.अनेकांच्या एकाच प्रभागातील एकासारख्या हरकती आहेत.

अशा प्रकारच्या सर्व अर्जदारांना सुनावणीसाठी बोलवले जाणार आहे. त्यापैकी केवळ पाच ते सहांना बोलवले जाणार आहे, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

Back to top button