Hyundai and Kia Cars : अबब! ह्युंदाई आणि कियाच्या ५ लाख गाड्या परत मागवल्या, वाहनांत मोठी त्रुटी | पुढारी

Hyundai and Kia Cars : अबब! ह्युंदाई आणि कियाच्या ५ लाख गाड्या परत मागवल्या, वाहनांत मोठी त्रुटी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेड इन दक्षिण कोरिया असलेल्या ह्युंदाई आणि किया या कार कंपन्यांनी यूएसमधील ४ लाख ८४ हजार वाहनांबाबत महत्वाची सूचना दिली आहे. तुम्ही राहत असलेल्या मोकळ्या जागेत ह्युंदाई आणि किया मालकांनी आपली कार लावावी अशी सूचना केली आहे. या कारला केव्हाही आग लागण्याची शक्यता असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ही वाहने दुरुस्त न केल्यास त्यात आग लागण्याचा धोका आहे. Hyundai and Kia Cars

कोरियातील Hyundai आणि Kia या दोन्ही कंपन्यांनी US मधील वाहनांसाठी स्वतंत्र रिकॉलची घोषणा केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की या वाहनांमधील हायड्रॉलिक इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट (HECU) मॉड्यूलमध्ये बिघाड असू शकतो.

काय आहे आहे बिघाड?

कारमधील बिघाडामुळे इलेक्ट्रिक शॉर्ट होऊ शकते, ज्यामुळे इंजिनला आग लागू शकते. परत मागवलेल्या वाहनांना आग लागण्याचा धोका कमी करण्यासाठी कंपन्यांचे डीलर सर्किट बोर्डमध्ये नवीन फ्यूज बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Hyundai and Kia Cars : किती गाड्यांमध्ये त्रुटी आहेत

रिकॉलमध्ये २०१४ ते २०१६ दरम्यान उत्पादित Kia Sportage आणि २०१६ ते २०१८ दरम्यान उत्पादित Kia K900s आणि २०१८ ते २०१८ दरम्यान बनवण्यात आलेल्या Hyundai Santa Fe कारचा समावेश आहे. यामध्ये १ लाख २७ हजार ७४७ Kia वाहने आणि ३ लाख ५७ हजार ८३० Hyundai वाहनांचा समावेश आहे. या त्रुटीमुळे आगीच्या एकूण ११ घटना आतापर्यंत घडल्या आहेत. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

यूएस सुरक्षा एजन्सीकडून अपील

यूएस सेफ्टी एजन्सी – नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशन (NHTSA) ने या वाहनांच्या मालकांना ऑटोमेकर्सच्या सल्ल्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, “उत्पादकांचा असा विश्वास आहे की अँटी-लॉक ब्रेक सिस्टमच्या इलेक्ट्रिकमध्ये अंतर्गत इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट असू शकते. वाहन चालवताना किंवा पार्क करताना आग लागण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे या गाड्या बंद असतानाही इतर वाहनांपासून दूर उभ्या कराव्या लागतात.

यापूर्वीही गाड्या परत मागवण्यात आल्या होत्या

ह्युंदाई आणि किया कंपनीने आगीच्या कारणासाठी यापुर्वी वाहने परत मागवली होती. ह्युंदाईचे माजी कर्मचारी व्हिसलब्लोअरला यांनी ही त्रुटी शोधून काढली होती. त्यांनी २०१६ मध्ये अहवाल दिला होता की Hyundai त्याच्या Theta II इंजिनशी संबंधित डिझाइन त्रुटी दूर करण्यात अयशस्वी ठरली होती. या बिघाडामुळे इंजिन स्टॉप होऊन आग लागत होती.

जबर दंड आकारण्यात आला

२०२० मध्ये, NHTSA ने म्हटले होते की ह्युंदाई आणि कियाच्या यूएस युनिट्स इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे वाहने वेळेवर परत मागवण्यात अयशस्वी ठरल्या होत्या, त्यानंतर या दोन्ही कंपन्यांना विक्रमी $ २१० दशलक्ष (सुमारे 15 अब्ज 70 कोटी रुपये) चा दंड देण्यास भाग पाडले होते.

Back to top button