कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या बालकांना १० हजार बालनिधी मिळणार | पुढारी

कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या बालकांना १० हजार बालनिधी मिळणार

पालघर : पुढारी वृत्तसेवा : कोरोना प्रादुर्भावाने आईवडील गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी दहा हजार रुपयांचा बालनिधी मिळणार आहे. याबाबतचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याकरिता प्रस्ताव पाठविण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निधीकरिता पात्र बालकांना लाभ देण्याकरीता कोविडमुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या ३ ते १८ वयोगटातील प्रतिबालकास एकदाच १० हजार रुपये बालकांच्या शैक्षणिक शुल्कासाठी वितरित करण्यात येणार आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे ३० जून २०२३ पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मुदतीनंतर येणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. प्रस्तावासंबंधी काही तांत्रिक अडचणी आल्यास या कार्यालयाने दिलेल्या पत्यावर जिल्हा बालसंरक्षण कक्ष, पालघर, कक्ष क्रमांक १०८, प्रशासकीय बिल्डींग अ इमारत, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, बोईसर रोड कोळगांव (पश्चिम) पालघर ४०९४०४ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मल्लिनाथ कांबळे यांनी केले आहे.

हेही वाचा 

Back to top button