मुंबई : मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांचा शरद पवार गटात प्रवेश | पुढारी

मुंबई : मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांचा शरद पवार गटात प्रवेश

सिडको; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार नितीन भोसले यांनी मनसेला सोड चिठ्ठी देत रविवारी (दि. १०) मुंबई येथे राष्ट्रीय पक्ष प्रमुख शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेटर येथे बोलवलेल्या राज्यातील निवडक पदाधिकार्यांची बैठक प्रसंगी माजी आमदार नितीन भोसले यांचा कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश केला. नाशिकसाठी तीन प्रमुख मागण्या मान्य केल्याने पक्ष प्रवेश केल्याची माहिती माजी आमदार नितीन भोसले यांनी दिली.

पक्ष प्रवेशा वेळी बोलतांना माजी आमदार नितीन भोसले यांनी सांगितले की महाराष्ट्राच्या हक्काचे नार-पारचे पाणी पुन्हा गोदावरी-गिरणा खोऱ्यात वळविण्यात यावे, ज्यामुळे उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा दुष्काळ निर्मुलणांस मदत होईल. दुसरी मागणी नाशिक शहर वा जिल्ह्यात आय टी पार्क मिळावे. तर तिसरी मागणी एक वा दोन मोठा ॲटोमोबाईल उद्योग मिळावेत या तीन मागण्या प्रामुख्याने शरद पवार यांचे समोर मांडण्यात आल्या. या मागण्यांना त्यांनी सकारात्मक निर्णय दिल्याने पक्ष प्रवेश केल्याची माहिती माजी आमदार नितीन भोसले यांनी दिली.

मुंबई येथे पक्ष प्रवेश वेळी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. श्रीनिवास पाटील, खा. फौजिया खान, खा. विद्या चव्हाण, महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे, युवक अध्यक्ष महेबुब शेख, आ. जितेंद्र आव्हाड, आ. राजेश टोपे, आ. एकनाथ खडसे, खा. अमोल कोल्हे नाशिक जिल्हा अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार, जिल्हा बॅंक माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले, माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे आदी सह निवडक पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणुक आयोगाने सिडको सातपूर व इंदिरानगर चा काही भागाचा समावेश करुन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ जाहीर केला त्या वेळी या मतदार संघातुन मनसे कडुन नितीन भोसले निवडुन आले होते . भोसले यांच्या पक्ष प्रवेशामुळे मनसेला खिंडार पडले आहे तर शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस ची ताकद वाढणार आहे.

Back to top button