जळगाव : रामदेववाडी अपघात प्रकरणातील दोघांना मुंबईत अटक | पुढारी

जळगाव : रामदेववाडी अपघात प्रकरणातील दोघांना मुंबईत अटक

जळगाव : तालुक्यातील रामदेववाडी येथे कार-मोटरसायकलचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपींना गुरूवारी (दि.२३) दुपारीअटक करण्यात आली. पुण्याच्या हिट आणि रन या प्रकरणात झालेल्या कारवाईनंतर १७ दिवसानंतर जळगाव पोलिसांनी ही कारवाई केली.  अर्णव अभिषेक कैल व अखिलेश पवार अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत डीवायएसपी संदीप गावित यांनी माहिती दिली.

जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे ७ मे रोजी भारधाव कारची मोटरसायकलला जोरदार धडक बसली. या अपघातात आई. दोन मुले व एक भाचा अशा तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला व या कारमध्ये नशेचे पदार्थ आढळून आले होते. मात्र गेल्या १७ दिवसांपासून या प्रकरणाबाबत कोणताही कारवाई झाली नाही. या प्रकरणातील संशयित आरोपी हे राजकीय व्यक्ती व त्यांच्याशी संबंधित असल्याने हे प्रकरण दडपण्यात येणार का? अशी चर्चा होती. त्यातच पुणे हिट आणि रन प्रकरणात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेवरून जळगाव पोलिस ठाण्यातील या प्रकरणातील तपास अधिकारी बदलण्यात आला. संशयित आरोपी अर्णव कैल व अखिलेश पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देताच त्यांच्यावर जळगाव पोलिसांनी कारवाई केली. मुंबई येथे जाऊन पोलिसांनी दोन्ही आरोपींना आज ताब्यात घेतले. त्यांना रात्री उशिरापर्यंत जळगाव येथे आणण्यात येणार असून शुक्रवारी (दि.२४) त्यांना न्यायालयात उभे करण्यात येणार आहे, अशीही माहिती डीवायएसपी संदीप गावित यांनी दिली.

Back to top button