पुढारी ऑनलाईन डेस्क: "इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन ही पूर्णपणे स्वतंत्र्य प्रणाली आहे. तिला अनलॉक करण्यासाठी ओटीपीची गरज लागत नाही, त्यामुळे ईव्हीएम हॅक करता येत नाही, अशी माहिती मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी आज (दि.१६ जून) पत्रकार परिषदेत दिली.
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवरून (ईव्हीएम) पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून, यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते आमने-सामने आले आहेत. निवडणूक आयोगाकडून मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत ईव्हीएम नेमकं कसे काम करतंय या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली.
ईव्हीएम छेडछाड प्रकरणात मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा सूर्यवंशी म्हणाल्या, "ईव्हीएमला ओटीपी लागत नाही, त्यामुळे एव्हीएम हॅक होऊ शकत नाही. लोकसभा निवडणुकीवेळी संबंधित मतदारसंघात सहआरोपी गुरव हे डेटा ऑपरेटर होते. त्यांच्यावर आम्ही पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस याचा सविस्तर तपास करत आहेत, असेही त्या म्हणाल्या.
मुंबई पोलिसांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पांडिलकर यांच्यावर ईव्हीएम प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बंदी असतानाही मंगेश पांडिलकर यांनी मुंबईतील गोरेगाव निवडणूक केंद्रात मोबाईल फोन वापरल्याचा आरोप आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या X पोस्टमध्ये मुंबई घटनेच्या वृत्ताचाही हवाला दिला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पांडिलकर यांच्यावर ईव्हीएम प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पंडिलकर यांना मोबाईल फोन दिल्याप्रकरणी निवडणूक आयोगाच्या एका कर्मचाऱ्यावरही गुन्हा दाखल केला आहे, या प्रकरणी उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या अनेक उमेदवारांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात फेरमतमोजणीनंतर रवींद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील हा सर्वात कमी फरकाने विजय नोंदला गेला आहे.
हे ही वाचा: