जळगाव : निंबोल येथील वेफर्स फॅक्टरीचा मालक निघाला चोर | पुढारी

जळगाव : निंबोल येथील वेफर्स फॅक्टरीचा मालक निघाला चोर

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : रावेर तालुक्यातील निंबोल या ठिकाणी असलेल्या एका वेफर्सच्या कारखान्यामध्ये चार लाख चाळीस हजार रुपये मशिनरी चोरीला गेलेल्या होत्या. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला असता यात फॅक्टरी मालक व फिर्यादीचे दोन साथीदार चोर निघाले असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रावेर तालुक्यातील निंबोल येथील निरज सुनिल पाटील यांचे नांदुरखेडा शिवारात श्रीकृष्ण केला व्हेपर्स ही फॅक्टरी आहे.३ रोजी निरज पाटील यांच्या फॅक्टरीतुन विविध मशनरी चोरीस गेल्या होत्या.रावेर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तपासाचे चक्र फिरविली. यावेळी पोलिसांनी आरोपी निरज पाटील (वय 24 वर्षे रा. निंबोल,) उमेश सुतार (वय 24 वर्षे) कौशल जंजाळकर, (वय 19 वर्षे दोघे रा. मेहतर कॉलनी रावेर) येथून ताब्यात घेऊन त्यांची विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली आहे.या बाबत तिघांना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेला 4 लाख 40 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी नीरज पाटील ,उमेश सुतार , कौशल जंजाळकर, यांनी आरोपी नीरज पाटील याच्या श्रीकृष्ण केला वेफर्स फॅक्टरी विमा काढलेला होता विम्याच्या खोटा लाभ घेण्यासाटी त्यांनी फौजदारी कट करून श्रीकृष्ण केला वेफर्स फैक्टरी मधील मजुरांच्या मदतीने रात्रीची चोरी केली म्हणून सदर गुन्ह्यात भादवि कलम 457,120 (ब),381,203 असे कलम वाढ करण्यात आली आहे. आरोपी सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे.पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोकॉ सचिन घुगे पोकॉ विशाल पाटील, पोकॉ प्रमोद पाटील,पोकॉ महेश मोगरे,पोकॉ राहुल परदेशी यांनी गुन्हाचा तपास करून आरोपी ताब्यात घेतले आहे.

चोरीचा बनाव करणा-या तिघा आरोपींकडून ४५ हजार रुपये किमतीची बनाना वेफर्स मशीन, ४५ हजार रुपये किमतीची पोटॅटो वेफर्स मशीन, ३५ हजार रुपये किमतीचा पोटॅटो पीलर मशीन, ४८ हजार रुपये किमतीचा ड्रायर मशीन, १५ हजार रुपये किमतीचा पॅकींग मशीन, १७ हजार रुपये किमतीचा एक ब्लोवर मशीन, १ लाख ४५ हजार रुपये किमतीचा कोटिंग पॅन मशीन, ९० हजार रुपये किमतीच्या पॅकींग मशीन असा एकूण ४ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Back to top button