जळगाव : पारोळामधील म्हसवे येथे गॅस सिलेंडरचा स्फोट; ९ सिलेंडरसह दोन वाहने जळून खाक | पुढारी

जळगाव : पारोळामधील म्हसवे येथे गॅस सिलेंडरचा स्फोट; ९ सिलेंडरसह दोन वाहने जळून खाक

जळगांव; पुढारी वृत्तसेवा : पारोळा तालुक्यात जवळील म्हसवे येथे झालेल्या गॅसचा सिलेंडर स्फोट झाल्याची घटना घटना घडली. या स्फोटात दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. घटनास्थळावरुन एकूण 21 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. या अपघातात दोन लाख पन्नास हजार आठशे रुपयांच्या मुद्देमाल मिळाला आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारोळा पोलिसात मोठा भाऊ या संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पारोळा तालुक्यातील म्हसवे या गावाजवळ 19 रोजी रात्री मोठा गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडरच्या स्फोटामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती. तसेच या ठिकाणी अवैधरीत्या गॅस भरण्यात येत असलेली दोन्ही चारचाकी वाहने जळून खाक झाली आहेत. अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. स्फोटामध्ये नऊ सिलेंडरचा स्फोट झालेला असून घटनास्थळी 12 सिलेंडर सुस्थितीत मिळालेले आहेत. घटनास्थळी दोन लाख पन्नास हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जळालेल्या गाड्यांसह जप्त केलेला आहे.

याप्रकरणी पुरवठा निरीक्षक विश्वजीत सिंह विजय सिंह गिरासे यांनी दिलेला फिर्यादीवरून पारोळा पोलिसात मोठा भाऊ उर्फ खंडेराव रामराव पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात आणखी कोणाचा तरी हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Back to top button