जळगाव : केंद्र – राज्य सरकारच्या शेती धोरणांविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन | पुढारी

जळगाव : केंद्र - राज्य सरकारच्या शेती धोरणांविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : केंद्राने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या शेती धोरणाच्या निषेधार्थ सडलेले कांदे व खराब झालेला कापूस रस्त्यावर टाकून भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भुसावळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

यावेळी भुसावळ तालुक्यात ठिकठिकाणी नाफेड केंद्र सुरू करावे, कांद्याची निर्यात बंदी तात्काळ उठवावी, कापसाला हमीभाव मिळावा, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, पीक विम्याचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. तसेच कापसाला 7020 चा हमीभाव असताना बाजारात व्यापाऱ्यांद्वारे प्रतिक्विंटल 6 हजार पेक्षा जास्त भाव मिळत नाही, याचाही निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, या मागणीचे निवेदन तहसीलदार नीता लबडे यांना देण्यात आले.

याप्रसंगी भुसावळ तालुका अध्यक्ष दीपक मराठे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, जिल्हा प्रवक्ता वाय. आर. पाटील, किसान सेल तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, लीगल सेल प्रमुख गौतम साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागो पाटील, भुसावळ नगरपालिका माजी नगरसेवक उल्हास पगारे विधानसभा क्षेत्र प्रमुख नाना पवार, महेश सोनवणे, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, पप्पू जकातदार, अनिल त्रंबक महाजन, दीपक निळे, इफ्तेखार मिर्झा आदीसह कार्यकर्ते व शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button