माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांना ‘क्षितिजा जीवनगौरव’ पुरस्कार | पुढारी

माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांना 'क्षितिजा जीवनगौरव' पुरस्कार

पंचवटी, पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी मंत्री पुष्पाताई व्यंकटराव हिरे यांना उमंग महिला फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘क्षितिजा महिला विशेष जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संजीवनी बँकवेट हॉल येथे आयोजित कार्यक्रमात सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या विविध कर्तबगार महिलांचा गौरव  करण्यात आला. ‘स्वरज्य रक्षक संभाजी राजे’ मालिकेतील ‘राणू अक्का’ यांची भूमिका साकारणाऱ्या अश्विनी महांगडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. उमंग महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षा विद्यासागर आहेर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

महाराष्ट्र राज्याच्या माजी सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तसेच माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री महिलारत्न श्रीमती पुष्पाताई व्यंकटराव हिरे यांच्या राजकारण, समाजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने महाराष्ट्राची मान नेहमीच उंचावली आहे, म्हणूनच उमंग महिला फाउंडेशन आयोजित क्षितिजा महिला विशेष जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात क्षितिजा विशेष महिला जीवनगौरव पुरस्काराने ऍग्रीकच्लरलच्या विश्वस्त सुनंदा राजेंद्र पवार, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, मुंबई एजुकेशन ट्रस्टच्या विश्वस्त मीनाताई भूजबळ यांना प्रदान करण्यात आला.

Back to top button