Sudhakar Badgujar | माझ्यावर हद्दपारीची बजावलेली नोटीस बेकायदेशीर, 18 तारखेला उत्तर देणार : बडगुजर | पुढारी

Sudhakar Badgujar | माझ्यावर हद्दपारीची बजावलेली नोटीस बेकायदेशीर, 18 तारखेला उत्तर देणार : बडगुजर

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा– समाजाला त्रासदायक असलेल्या गुन्हेगाराला तडीपार नोटीस बजावली जाते. मी समाज व लोकांसाठी काम करणारा लोकसेवक आहे. पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून सुडबुद्धीने, हेतुपुरस्कर बजावलेली हद्दपारीची नोटीस बेकायदेशीर आहे. मी दिनांक १८ मे रोजी दिलेल्या मुदतीत नोटीसला उत्तर देणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. या नोटीस मुळे सहानुभूती मिळत लाखो मतदान वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या हद्दपारीच्या नोटीस मध्ये ज्या गुन्ह्यांचा उल्लेख केला आहे. ते २०१० ते २०१४ कालावधीतील गुन्ह्यांचा उल्लेख आहे. हे राजकीय स्वरूपाचे गुन्हे असून या गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे. २०१४ ची एक केस ही न्यायप्रविष्ठ असून यात हायकोर्टात अपील केले आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी सलीम कुत्ता सोबत डान्स केलेल्या प्रकरणात बेकायदेशीर गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात दाद मागितली आहे. यात हद्दपरीची कारवाई होऊ शकत नाही, १ वर्षाच्या कालावधीत ३ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दखल झाल्यास हद्दपार कारवाई होते. त्यात मी लोकसेवक आहे, माझ्यावर केलेली कारवाई सूडबुद्धीने राजकीय स्वार्थापोटी तसेच लोकसभा निवडणूक बघून सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर दबाव आणून ही कारवाई करण्यात आली आहे. मतदार सुज्ञ आहे या चुकीच्या कारवाई मुळे आमच्या पक्षाचे नक्कीच मताधिक्य वाढणार, आणि विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकणारआहे. एकीकडे ड्रक्स माफीयांना आश्रय व दुसरीकडे पप्पी दे पारुला मोकाट असताना त्याचे सीडीआर रिपोर्ट अजून पोलिसांनी तपासले नाही. कारवाई देखील केली नाही. मला दिलेली हद्दपारीची नोटीस ही बेकायदेशीर आहे. एक कथित व्हिडिओ च्या संदर्भात पीडित महिलेने पोलिसात तक्रार केली परंतु त्याच महिलेला आरोपीच्या पिंजऱ्यात बसून दोषी ठरवण्यात आले. असे उदाहरणे सुद्धा पोलीस प्रशासनाच्या बाबतीत घडले आहे. त्यामुळे पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून सुडबुद्धीने, हेतुपुरस्कर कारवाई न करता सत्यता पडतळावे असे बडगुजर यांनी म्हटले आहे. तसेच दिनांक १८ मे रोजी नोटीसला उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा –

Back to top button