Lok Sabha Election 2024 : शिरोळमधील आलास येथे ईव्हीएममध्ये बिघाड; दीड तास मशीन बंद | पुढारी

Lok Sabha Election 2024 : शिरोळमधील आलास येथे ईव्हीएममध्ये बिघाड; दीड तास मशीन बंद

कवठे गुलंद; पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले लोकसभा मतदार संघातील आलास (ता. शिरोळ) येथील मतादान केंद्रावर आज (दि.७) सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले. यानंतर एका ईव्हीएमध्ये (EVM) बिघाड झाल्याने गोंधळ उडाला. सुमारे दीड तास मशी बंद पडल्याने मतदान थांबवण्यात आले होते.

आलास येथील २६० क्रमांकाच्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर मतदान थांबवण्यात आले. सुमारे दीड तासांनंतर मतदान पुन्हा सुरू झाले. मतदान सुरू झाल्यानंतर या मतदान केंद्रावर पहिल्या दोन तासांत ६.२६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा : 

Back to top button