Lok Sabha Election 2024 | भुजबळ समर्थक म्हणतात पेटवा ‘मशाली’ | पुढारी

Lok Sabha Election 2024 | भुजबळ समर्थक म्हणतात पेटवा 'मशाली'

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांसाठी महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरणे सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला भुजबळांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्यांच्या सोशल मीडियावर पेटवा मशाली, अशा पोस्ट फिरत असल्याचे चित्र होते. नक्की यातून काही संदेश देण्याचा तर प्रयत्न नाही ना, अशी चर्चा उपस्थित जनतेमध्ये होती. (Lok Sabha Election 2024)

नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचे गुरुवारी (दि.२) अर्ज भरण्यात आले. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. (Lok Sabha Election 2024)

नाशिकमधून उमेदवार कोण असेल यासाठी साधारण दीड महिना प्रतीक्षा करावी लागली. यामध्ये अनेक राजकीय नाट्य रंगले. सुरुवातीला शिवसेनेची जागा असल्याने मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदे यांनी कोणालाही न विचारता नाव घोषित केले. त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केल्याप्रश्नी नाराजी व्यक्त केली. उमेदवाराचा वाद राज्यातील वरिष्ठांसोबतच केंद्रात पोहोचला. केंद्राने राज्यातील मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते तसेच राष्ट्रीय पातळीवरील ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे नाव दिले. मात्र, राज्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी नाव जाहीर करण्यास विलंब केला. उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्याचे कारण देत भुजबळ यांनी निवडणुकीतूनच माघार घेतली. माघार घेतल्यानंतर ओबीसी आणि समता परिषद यांनी बैठक घेऊन निवडणूक लढविण्याबाबत भुजबळांना सांगण्यात यावे, असा ठराव संमत केला होता. भुजबळांनी या बाबतीत माघार असल्याचे स्पष्ट केले होते. (Lok Sabha Election 2024)

दरम्यान, २०१४ च्या पंचवार्षिक निवडणुकीत छगन भुजबळ आणि २०१९ च्या पंचवार्षिक निवडणुकीत समीर भुजबळ दोघांनाही हेमंत गोडसे यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागला होता. यंदा मात्र भुजबळांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर होत असल्याचे समजताच गोडसे यांनी तत्काळ मुख्यमंत्री यांचे निवासस्थान गाठत उमेदवारीचा हट्ट धरला होता.

उष:काल होता होता…

भुजबळ समर्थकांनी आपल्या सोशल मीडियावर उष:काल होता होता..काळरात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असे वाक्य तर २०१४+२०१९=२०२४ असे आकडे लिहिले असल्याने मित्रपक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रमित झाले होते.

हेही वाचा –

Back to top button