Nashik Crime News | दोघा भावांकडून तीन महिलांचा विनयभंग, पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल | पुढारी

Nashik Crime News | दोघा भावांकडून तीन महिलांचा विनयभंग, पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : पंचवटीतील कृष्ण नगर परिसरात राहणाऱ्या दोघा भावांनी परिसरातील तीन महिलांचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि.४) रात्री ९.३० वाजता घडली. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित सचीन दप्तरे व योगेश दप्तरे यांनी परिसरातील तीन महिलांचा विनयभंग करीत शिवीगाळ करून दमदाटी केली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीवर अत्याचार

लग्नाचे आमीष दाखवून एकाने पीडितेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघड झाली. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित हरीष दिघे (रा. आझाद चौक, जुने नाशिक) याने २०१८ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार केले. तसेच अश्लिल फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात हरीष विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –

Back to top button