Dhule News | नकाणे येथील गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी  | पुढारी

Dhule News | नकाणे येथील गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी 

धुळे : पुढारी वृत्तसेवा- गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत नकाणे तलाव येथे सुरु असलेल्या कामास जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज भेट देऊन पाहणी केली.

यावेळी जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी खोंडे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विवेक महाले, किसान ट्रस्टचे कार्यकर्ते, नाम फाउंडेशनचे प्रदीप पानपाटील यांचेसह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी ७ मार्च, २०२४ च्या आदेशानुसार गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानातंर्गत नकाणे तलावातुन गाळ काढण्यास परवानगी तसेच किसान ट्रस्ट यांना स्वखर्चाने गाळ काढून वाहुन नेण्यास परवानगी दिली आहे. नकाणे तलाव येथून दररोज ७५ टॅक्टर, २५ डंपर व २ पोकलॅनच्या सहाय्याने गाळ काढण्याचे काम करण्यात येत असून नाम फाऊडेशन यांना मशिनरी वाढविण्याबाबत तसेच जास्तीत जास्त गाळ काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गोयल यांनी दिल्या. गाळ काढण्याचे कामाबाबत समाधान व्यक्त करुन नकाणे तलाव परिसरातील शेतकऱ्यांनी काढलेला गाळ घेवून जाण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

Back to top button