Jalgaon Crime | दोन लाखाचे देशी दारू बनविण्याचे साहित्य नष्ट, सात ठिकाणी कारवाई | पुढारी

Jalgaon Crime | दोन लाखाचे देशी दारू बनविण्याचे साहित्य नष्ट, सात ठिकाणी कारवाई

जळगाव – जामनेर तालुक्यातील महूखेडा वाडी गोडखेड या गावा मधील सात ठिकाणी कारवाई करुन एक लाख 98 हजार पाचशे रुपये किमतीचे दारू बनवण्याचे साहित्य व रसायने पोलिसांनी नष्ट केले.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जामनेर तालुक्यातील सात गावांमध्ये पोलिसांनी दि. 22 रोजी छापे टाकून जवळपास दोन लाख रुपयांचा गावठी दारु तयार करण्याचा मुद्देमाल नष्ट केला.

महूखेडा संजय भिलवाडी 800 लिटर कच्चे साहित्य व पस्तीस लिटर दारूअसा 43 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल, वाडी वाडी शिवारामध्ये भास्कर देविदास व्हील, पंचफुला युवराज भिल, बनाबाई अभिमान भील या ठिकाणी टाकलेल्या झाडीमध्ये अकराशे लिटर गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन याची किंमत 45 हजार रुपये, गोडखेडा शिवारातील युवराज दगडू जाधव, देविदास विठ्ठल कोळी, देविदास आनंदा कोळी, रामा कौतिक कोळी 2002 हजार लिटर गावठी दारू तयार करण्याचे कच्चे पक्के रसायन असा एकूण एक लाख रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डी वाय एस पी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे, चंद्रकांत देवघे, सुनील जोशी, मुकुंदा पाटील, राजू तायडे ,चंद्रशेखर नाईक, तृप्ती नन्नवरे, निलेश घुगे, ज्ञानेश्वर देशमुख, सोनसिंग डोभाड, महेंद्र राठोड, योगेश पाटील यांनी केली.

Back to top button