Nashik Shodh Mahaveg : एमसीए घेणार ‘शोध महावेगाचा’, राज्यात पाच ठिकाणी आयोजन | पुढारी

Nashik Shodh Mahaveg : एमसीए घेणार 'शोध महावेगाचा', राज्यात पाच ठिकाणी आयोजन

नाशिक पुढारी ऑनलाइन : भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट होय. अतिशय बिकट परिस्थितीतून पुढे येत अनेक युवा क्रिकेटपटू म्हणून कारकिर्द करतात. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन देखील महाराष्ट्रातील अशाच प्रतिभेचा शोध घेत आहे. “महा स्पीडस्टार शोध महावेगाचा” या मोहिमेतून महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांचा शोध घेतला जाणार आहे. राज्यात पाच ठिकाणी हा उपक्रम राबविला जाणार आहे. (Nashik Shodh Mahaveg)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लपलेले वेगवान गोलंदाज शोधण्यासाठी एमसीएची ही शोधमोहीम आहे. या मोहिमेचा प्रारंभ 9 मार्चला नाशिकमधून होणार आहे. दरम्यान या स्पर्धेत या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेले वेगवान गोलंदाज शोधून त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचा यामागे उद्देश असून नाशिक नंतर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर व पुणे जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जाणार आहे. ३१ मार्चला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियम येथे या स्पर्धेचा समारोप होणार आहे. (Nashik Shodh Mahaveg)

कुणाला घेता येणार सहभाग?

हा एमसीएचा उपक्रम आहे. यात महाराष्ट्रातील कोणत्याही गावातील व शहरातील वेगवान गोलंदाज भाग घेऊ शकतो. रजिस्ट्रेशन सुरु झाले असून सर्वांसाठी विनामूल्य आहे.  (Nashik Shodh Mahaveg)

मुलींनाही संधी

स्पर्धेत खेळाडूंना विनामूल्‍य सहभागी होता येणार आहे. मुलांसोबत मुलींनाही या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे.  स्पर्धेत मुले आणि मुली या दोघांच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन गटांत चुरशीचा थरार रंगणार आहे.

विजेत्यांना पारितोषिक

विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच खेळाडूंना महाराष्ट्र प्रीमियर लीग, महिलांची महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या लिलावामध्ये सहभागाची संधी मिळेल. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गुणवंत गोलंदाजांवर प्रशिक्षकांकडून विशेष लक्ष ठेवले जाईल व त्‍यांच्‍यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे वर्षभर विशेष प्रशिक्षण शिबिर विनामूल्य राबविले जाईल.

स्पर्धेचे वेळापत्रक

९ आणि १० मार्चला नाशिक (उत्तर महाराष्ट्र) आणि संभाजीनगर (मध्य विभाग), १६ आणि १७ मार्चला नांदेड (पूर्व विभाग) आणि सोलापूर (दक्षिण विभाग), आणि २३ व २४ फेब्रुवारीला पुणे (पश्चिम विभाग) या ठिकाणी वेगवान गोलंदाजांची शोधमोहीम पार पडेल. या पाच विभागांतून अंतिम फेरीत निवड झालेल्या गोलंदाजांची महाअंतिम फेरी ३१ मार्चला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमवर होईल.

नोंदणी कशी कराल? 

स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या संकेतस्‍थळावर नोंदणी करायची आहे. त्यात नावासह, जन्मतारिख स्पर्धेचे ठिकाण व इतर माहिती भरुन फॉर्म सबमीट करावयाचा आहे.

स्पर्धेचे काही नियम… 

1) वयाचा निकष -
पुरुष
- 16 वर्षांखालील - 1/9/2008 ते 31/8/2010 दरम्यान जन्मलेले खेळाडू
- 19 वर्षांखालील - 1/9/2005 ते 31/8/2008 दरम्यान जन्मलेले खेळाडू
- वरिष्ठ श्रेणी - 1/9/1992 आणि 31/8/2005 दरम्यान जन्मलेले खेळाडू
महिला
- कनिष्ठ - 1/9/2005 ते 31/8/2008 दरम्यान जन्मलेले खेळाडू
- ज्येष्ठ - ३१/८/२००५ पूर्वी जन्मलेले खेळाडू

२) सहभागींनी एमसीएला आवश्यक असल्यास त्यांचे मूळ जन्म प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

३) प्रत्येक सहभागीला ४ चेंडू टाकण्याची संधी मिळेल. स्पर्धेसाठी जलद गोलंदाजाचा विचार केला जाईल.

4) MCA ने दिलेले क्रिकेट बॉल वापरणे अनिवार्य आहे.

5) 1 सहभागी 1 स्थानासाठी नोंदणी करू शकतो. एकाधिक नोंदणींना परवानगी नाही.

6) फेरी १ साठी ठिकाणे- नाशिक, छ.संभाजीनगर, नांदेड, सोलापूर आणि पुणे. अंतिम फेरी पुण्यात होणार आहे.

7) सहभागी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकक्षेत राहणारे असावेत.

8) स्पर्धेबाबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सर्व निर्णय सर्व सहभागी खेळाडूंना बंधनकारक असतील.

Back to top button