अॅड. गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला दणका; एसटी बँकेतील संचालकपद रद्द | पुढारी

अॅड. गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला दणका; एसटी बँकेतील संचालकपद रद्द

पुढारी ऑनलाईन डेस्क : अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीचे एसटी बँकेतील संचालकपद रद्द करण्यात आले आहे. सहकार खात्याने ही कारवाई केली आहे. सदावर्ते दाम्पत्य यापुढे बँकेत तज्ज्ञ संचालक म्हणून राहणार नाहीत. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.

…त्यामुळे गुणरत्न सदावर्ते दाम्पत्यावर कारवाीचा बडगा

अॅड. गुणरत्न सदावर्ते कार्यकारिणीच्या बैठकांना उपस्थित राहिलेले नाहीत. ते आपल्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत राहिलेले आहे. त्यांच्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, सदावर्ते दाम्पत्याविरोधात एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे ऑक्टोबर २०२३ मध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार सहकार आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई करत संचालक पद रद्द करण्याचा निर्णय दिला.

संदीप शिंदे यांनी सांगितले की, सदावर्ते यांची सत्ता एसटी बँकेत आली, त्यापासून त्यांचा कारभार चांगला राहिलेला नाही. त्यांनी बँकेला खड्ड्यात घातले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा 

Back to top button