भुसावळ शहरात मच्छरांचा सुळसुळाट.! फवारणी करा ; शिवसेना ठाकरे गटाची मागणी | पुढारी

भुसावळ शहरात मच्छरांचा सुळसुळाट.! फवारणी करा ; शिवसेना ठाकरे गटाची मागणी

जळगाव : भुसावळ ही ” अ” वर्ग नगर पालिका आहे. दोन लाख वस्तीच्या या शहरात मच्छरांचा सुळसुळाट झालेला असून. नगर परिषद सुस्त झाली आहे. नागरिकांना घाण आणि मच्छरांमुळे घरात किंवा अंगणात बसने सुद्धा कठीण झालेले आहे. नगर परिषद ने शहरात चार दिवसांत औषध फवारणी व रिक्षा द्वारे धुरळणी करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

शहरामध्ये मच्छरांचा उच्छाद झालेला असून नागरिकांना घरात किंवा घरा बाहेर बसणे अवघड झाले आहे. यासाठी शहरात फवारणी करण्यात यावी या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. सोबत नगर पालिका अधिकाऱ्यांना मच्छर अगरबत्ती भेट देण्यात आली.

यावेळी नगर परिषदचे उप मुख्याधिकारी ढाके व विवेक माकोडे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, दरमहा ७ लाख रुपयांचा ठेका १२ महिन्यासाठी दिलेला असून ते शहरात औषध फवारणी व धुरळणी करत असतात. मात्र, ही बाब शिवसेना पदाधिकारी यांना पटली नाही. कारण सात लाख एका महिन्याला म्हणजे १२ महिन्यासाठी ८४ लाख रुपये खर्च करूनही कोणतेही काम समाधानकारक दिसत नसल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. पुढील औषध फवारणी लवकरच करू नगरपरिषेदेकडून सांगण्यात आल्यावर कोणत्या वार्ड मध्ये कोणत्या दिवशी फवारणी केली जाईल याचा तक्ता पेपर व सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवा अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.

व याबाबतीत शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक प्रत्येक भागात फवारणी होते किंवा नाही यावर लक्ष ठेवतील व शहरात योग्य काम होण्यासाठी सहकार्य करतील असेही सांगण्यात आले.  निवेदन देताना शहर प्रमुख दीपक धांडे, निलेश महाजन, मा. नगरसेवक मुकेश गुंजाळ, दिलीप सुरवाडे, बबलु ब_हाटे, युवा सेना जिल्हा प्रमुख सूरज पाटील, शरद जैस्वाल, राकेश खरारे, शेख महमूद, योगेश बागुल, विकास खडके, सोनी ठाकूर, पिंटू भोई, संजू भोई, अरुण साळुंके, मनोज पवार यांच्या सह शिवसैनिक उपस्थितीत होते.

हेही वाचा :

Back to top button