भुसावळ मतदारसंघातील महिला मतदारांचा टक्का वाढविण्याठी प्रयत्न करणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद | पुढारी

भुसावळ मतदारसंघातील महिला मतदारांचा टक्का वाढविण्याठी प्रयत्न करणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव : पुढारी वृत्तसेवा;  जळगाव जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांचा टक्का दोन टक्क्याने कमी आहे. त्यामध्ये भुसावळ विधानसभा क्षेत्रामध्ये हा आकडा पाच टक्के आहे. तो वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच भुसावळातील 180 मतदान केंद्रांवर वेब कॉस्टिंग होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हाभरात विधानसभा नुसार आढावा घेण्यात येत आहे. यात नुकत्याच मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी संपूर्ण जिल्ह्याचा विधानसभा नुसार आढावा घेतला. त्यामध्ये भुसावळच्या कामगिरीवर त्यांनी कौतुक केल्याचे सांगितले.

या बैठकीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असून त्यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांना 12 सूचना दिल्या जाणार आहेत. त्यानुसार पुढील नियोजन करण्यात येणार आहे. तसेच डीपीडीसीच्या माध्यमातून पाच कोटी 17 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून अतिरिक्त निधी नगर फंडातून देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्र हे अद्यावत प्रत्येक मतदाराला मिळणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मतदान केंद्रे हे संवेदनशील नसतील याची काळजी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासन एकत्रित काम करणार आहे व त्या ठिकाणी शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या निवडणुकीत व यावर्षी होणाऱ्या निवडणुकीमध्ये फरक आहे. जे पूर्णपणे मतदार बेडवर किंवा 40 टक्के दिव्यांग आहे. त्यांना घरून मतदान करण्याची सुविधा या वेळेस निवडणूक आयोगाने दिलेली आहे. त्यासाठी त्यांना एक अर्ज भरावा लागणार आहे.

हेही वाचा :

Back to top button