शिक्षणमंत्र्यांनी घेतला दहावी-बारावी परीक्षा तयारीचा आढावा | पुढारी

शिक्षणमंत्र्यांनी घेतला दहावी-बारावी परीक्षा तयारीचा आढावा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी पुण्यात राज्यातील वरिष्ठ शिक्षण अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान शैक्षणिक संस्थांनी त्यांची जागा आणि इमारती न देण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यासह अन्य विषयांवर चर्चा केली आणि परीक्षेदरम्यान कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य मंडळाला दिले.

यासंदर्भात राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, दहावी-बारावीच्या परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे आणि काल आम्ही सर्व शैक्षणिक संस्थांचे मालक आणि संचालकांसोबत परीक्षा आयोजित करण्यासाठी जागा देण्याबाबत बैठक घेतली. सर्वांनी यासाठी सहमती दर्शवली आहे आणि कोणतीही अडचण येणार नाही. त्याशिवाय आम्ही सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांना परीक्षेच्या काळात आणि त्यानंतरही पेपर तपासणीच्या वेळेत आम्हाला सहकार्य करावे असे कळवले आहे. आणि त्या सर्वांनी त्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे या वर्षी परीक्षेच्या दरम्यान कोणतीही अडचण येणार नसल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

Back to top button