नाशिकचे मराठा बांधव गनिमीकाव्याने मुंबईत दाखल, उर्वरित पुण्याच्या दिशेने रवाना | पुढारी

नाशिकचे मराठा बांधव गनिमीकाव्याने मुंबईत दाखल, उर्वरित पुण्याच्या दिशेने रवाना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत आंदोलन होणार आहे. त्यासाठी गनिमीकाव्याने जिल्ह्यातील मराठा बांधवांना मुंबईत दाखल केले आहे. उर्वरित बांधव बुधवारी (दि.२४) सकाळी न पुणेच्या दिशेने रवाना झाले आहेत.

गायकर यांनी सांगितले की, आंदोलनाचे नियोजन ७० टक्के यशस्वी झाले. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी रसद म्हणून तांदूळ, तेल, डाळ, शेंगदाणे आदी अन्नधान्य जमा केले आहे. ते घेऊन मराठा बांधव पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. तालुकानिहाय मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहनही गायकर यांनी केले. जरांगे-पाटील यांनी पुकारलेला मराठा समाजाचा अंतिम लढा संपूर्ण ताकदीने लढण्यासाठी नाशिककर सज्ज असून, ते आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे आंदाेलन शांततेत होण्यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दुचाकीधारकांनी हेल्मेट वापरावे, वाहनांची कागदपत्रे सोबत ठेवा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

विविध क्षेत्रांतील बांधवांची मदत

आंदोलनात सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांनी, संघटनांनी सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यानुसार वकील, डॉक्टर, अभियंता यांच्यासह विविध क्षेत्रांतील बांधवांनी आर्थिक, वैद्यकीय, सामाजिक मदत करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button