जळगाव : ‘हिट अँड रन’ कायदेविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन | पुढारी

जळगाव : 'हिट अँड रन' कायदेविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने हिट अँड रन या प्रकरणांमध्ये कायदा आणण्याचे प्रस्तावित केलेले आहे. या कायद्यामध्ये शिक्षा व दंडाची रक्कम मोठी असल्याने या कायद्याला विरोध दर्शविला आहे. या प्रस्तावित कायद्याविरोधात जळगाव जिल्हा मोटर असोसिएशन व ट्रान्सपोर्ट एजंट असोसिएशन तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. Jalgaon

यावेळी जळगाव मोटर ओनर्स अँड ट्रान्सपोर्ट एजंट असोसिएशनचे अध्यक्ष जसपाल सिंग बग्गा, उपाध्यक्ष दिलीप टेहलयांनी, अशोक वाघ, सेक्रेटरी अरुण दलाल, सह सेक्रेटरी राजेंद्र करे, खजिनदार महेंद्र अबोटी, सदस्य मुस्ताक भाई, सचिन व्यास, प्रमोद कुमार सिंग, रवी केसवाणी, दिनेश लोढाया आदी उपस्थित होते. Jalgaon

देशभरात या कायद्यामुळे वाहन चालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे, तरी याबाबत संतुलित व योग्य तो निर्णय केंद्र सरकारने घ्यावा, अशी मागणी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये ट्रान्सपोर्ट कंपनीत अनेक गाड्या 500 आसपास गाड्या उभे आहेत. तसेच वाहन चालक सुरक्षित ठिकाणी वाहने उभी करीत त्यांना दिसून येत आहे.

हेही वाचा 

Back to top button