Nashik Leopard : सिडकोतील सावतानगर भागात बिबटया दिसल्याने नागरिकांमधे घबराट | पुढारी

Nashik Leopard : सिडकोतील सावतानगर भागात बिबटया दिसल्याने नागरिकांमधे घबराट

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा ; शुक्रवारी पहाटे सिडकोतील सावतानगर भागात तसेच शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या संपर्क कार्यालयाच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वावर सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

सिडकोतील सावतानगर परिसरातील विठ्ठल मंदिर तसेच जीएसटी कार्यालय, मिलीटरी हेडक्वार्टर, जलकुंभ जवळ अभ्यासिका व कॉलनी परिसरात बिबट्याचा वावर आहे. बिबट्याला ताबडतोब वन विभागाने पिंजरा लावून जेरबंद करावे अशी मागणी सध्या आसाम दौऱ्यावार असणाऱ्या शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे भ्रमणध्वनीद्वारे केली आहे. आतापर्यंत सिडकोच्या मळे परिसरात दिसणारा बिबट्या आता थेट नागरी वस्तीत घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वजण झोपेत असल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून बिबट्याला त्वरित जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान अंबड पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी गर्दि हटविली आहे. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी येण्यासाठी रवाना झाल्याची माहिती मिळते.

हेही वाचा :

Back to top button