Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील १५१ ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान | पुढारी

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील १५१ ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील 167 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका जाहीर झालेल्या होत्या. यापैकी उद्या (दि.5) 151 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. या सर्व ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या मतदानासाठी लागणारे मतदान यंत्र, अधिकारी व पोलीस हे  बंदोबस्तासाठी रवाना झाले आहे. जिल्ह्यामधील 13 जागांसाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. तर 19 सरपंचांची बिनविरोध निवड झालेली आहे. तर 471 सदस्य हे बिनविरोध निवडले गेले आहे. पालकमंत्र्याच्या मतदार संघातील चार ग्रामपंचायती बिनविरोध तर संकट मोचक यांच्या मतदारसंघात एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही.

जिल्ह्यातील 151 ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी झालेली असून प्रत्येक तालुक्यावर होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा अधिकारी कर्मचारी पोलीस बंदोबस्त हा रवना झालेला आहे. जळगाव जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायत व एक सरपंच पदासाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही तर 471 सदस्य हे बिनविरोध निवडले गेले असून 16 ग्रामपंचायत या बिनविरोध निवडल्या गेलेल्या आहेत. यामध्ये भडगाव दोन, अंमळनेर एक, चाळीसगाव दोन, चोपडा दोन, जळगाव दोन, पारोळा 2, यावल एक, धरणगाव चार ग्रामपंचायत बिनविरोध झालेले आहेत.

जामनेर तालुक्यात 23 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. तर मुक्ताईनगर मध्ये 13 ग्रामपंचायतीच्या निवडणूक होणार आहेत. या दोन्ही मतदारसंघांमध्ये म्हणजे संकट मोचक नामदार गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात एकही ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आलेली नाही. तर शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील आमदार एकनाथराव खडसे यांच्याही बालेकिल्ल्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. तर पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील चार ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या आहेत.

Back to top button