Dhule Accident : सामोडे चौफुलीवर ट्रकच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू | पुढारी

Dhule Accident : सामोडे चौफुलीवर ट्रकच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील सामोडे चौफुलीवर ट्रकने महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातात सामोडे येथील हिराबाई सदाशिव सोनवणे (वय.65) या जखमी झाल्या. ही घटना दुपारी घडली. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. (Dhule News)

सामोडे गावातील हिराबाई सोनवणे या सकाळी रिक्षाने सामोडेहून पिंपळनेर येथे बाजार करण्यासाठी आल्या. रिक्षा स्टॉप वरती रिक्षा उभी राहिल्याने हिराबाई रिक्षातून उतरताना दहिवेल कडून सटाण्याकडे येणारी ट्रक क्र.केए.56,7313 ट्रकने हिराबाई सोनवणे यांना धडक दिल्याने रस्त्यावर त्या पडल्या. या अपघातात हिराबाई यांच्या दोन्ही पायांवर ट्रकचे मागील चाक गेल्यामुळे त्यांना बाबा फेंन्ड सर्कल गृपचे पप्पू पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ.राकेश मोहने यांनी प्रथम उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे.

मयत हिराबाई यांचे मुंबई येथे निवासस्थान होते. परंतु पतीच्या निधनानंतर त्या आपल्या तीन मुली, एक मुलगा, सून असा परिवार घेऊन पिंपळनेर जवळील सामोडे येथे स्थायिक झाल्या होत्या. आज नियतीने त्याच्यांवर घाला घातला.  अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यविधी झाला. त्याच्या पश्चात एक मुलगा, सुन, तिन मुली असा परिवार आहे. त्या राकेश सदाशिव सोनवणे यांची आई होत.

Back to top button