नाशिक: नगर-मनमाड रस्त्यावर ट्रकने सायकलस्वाराला चिरडले | पुढारी

नाशिक: नगर-मनमाड रस्त्यावर ट्रकने सायकलस्वाराला चिरडले

येवला; पुढारी वृत्तसेवा: मालवाहू ट्रकखाली चिरडून सायकलस्वार ठार झाला. ही घटना नगर -मनमाड रस्त्यावरील पाटाजवळ आज (दि.१०) घडली. जनार्दन जगन्नाथ गायकवाड (वय 55 रा. धानोरे) असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे. या अपघातामुळे नगर – मनमाड रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. येवला शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

अपघातस्थळी माजी आमदार मारुतीराव पवार यांचे चिरंजीव शरद पवार यांनी वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली. नगर – मनमाड महामार्ग हा पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा बनला आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे असून स्पीड बेकरवर पट्टे नाहीत. या महामार्गाची टोल वसुली जोरात असून खड्डे केव्हा बुजवले जाणार व रस्त्यांवर पट्टे केव्हा मारले जाणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा 

Back to top button