Nashik: येवला येथे भरचौकात महिलेवर कोयत्याने वार | पुढारी

Nashik: येवला येथे भरचौकात महिलेवर कोयत्याने वार

येवला, पुढारी वृत्तसेवा: भरबाजारात महिलेच्या मानेवर आणि अंगावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना येवला शहरातील विंचूर चौफुलीवर आज (दि.३) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. अरुण दाभाडे असे हल्लेखोराचे नाव आहे. तर पूजा दाभाडे असे जखमी महिलेचे नाव आहे. हे दोघे पती-पत्नी असल्याचे समजते. (Nashik)

अरुण दाभाडे हा भारतीय लष्कराच्या सेवेत असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. तो सुट्टीवर घरी आला होता. या हल्ल्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. हल्लेखोराला जनतेने तात्काळ पकडले व पोलिसांच्या हवाली केले असून जखमी महिलेस तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बाजारच्या दिवशी अत्यंत गर्दीच्या वेळेस राज्य महामार्गावर झालेल्या या घटनेने शहरामध्ये खळबळ माजली आहे. (Nashik)

हेही वाचा 

Back to top button