नाशिक : अवनखेड येथे विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मृत्यू | पुढारी

नाशिक : अवनखेड येथे विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मृत्यू

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील आवनखेड येथे आज (दि. २) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पंधरा वर्षीय विद्यार्थ्यांचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याने अवनखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील आवनखेड येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी समाधान बकाराम कोकाटे (वय १५) हा इयत्ता नववीत शिकत होता. तो मित्राबरोबर तेथील एका वाघदेवनगर वस्तीजवळ असलेल्या गावतळ्यात पोहण्यासाठी गेला होता. यावेळी समाधानला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे अवनखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास दिंडोरी पोलीस स्टेशन करीत आहे.

Back to top button