Heena Gavit : खा. हिना गावित यांचा गणेश मिरवणुकीत ढोल ताशाच्या तालावर ठेका | पुढारी

Heena Gavit : खा. हिना गावित यांचा गणेश मिरवणुकीत ढोल ताशाच्या तालावर ठेका

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा : राजकीय नेत्यांचा विसर्जन मिरवणुकीतील सहभाग आणि नाचणे हा नंदुरबार गणेशोत्सवाला लाभलेला वेगळा पैलू आहे. येथील राजकीय नेत्यांचे नृत्य बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरला आहे. यंदाची दादा गणपतीची विसर्जन मिरवणूक अशाच प्रकारे भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्यामुळे चर्चेत आली आहे. खासदार हिना गावित (Heena Gavit) यांनी ढोल ताशाच्या तालावर धरलेला ठेका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मानाच्या दादा गणपतीच्या मिरवणुकीत अस्सल खानदेशी ढंगात ढोल ताशाच्या पथकासमवेत नृत्य करून खासदार गावित यांनी उपस्थितांना अचंबित केले. त्यांच्या समवेत मंडळातील महिला कार्यकर्त्या आणि भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यादेखील सहभागी झाल्या होत्या. गरबा मंडळ असो की गणेश मंडळ असो, हिना गावित (Heena Gavit) यांनी ढोल ताशाच्या गजरात ठेका धरून कार्यकर्त्यांना प्रभावित करताना यापूर्वीही पाहायला मिळाले आहे.

दरम्यान, नंदुरबार येथील गणपती विसर्जन मिरवणुकी म्हटल्या की संपूर्ण महाराष्ट्रात आकर्षणाचा आणि चर्चेचाही विषय असतो. मानाच्या दादा आणि बाबा गणपतीची हरिहर भेट हा नंदुरबारच्या गणेशोत्सवाचा परमोच्च बिंदू आहे. तथापि विसर्जन मिरवणुकीत व्यायाम शाळा आणि गणेश मंडळाकडून सादर होणारे नृत्य, ढोल ताशाच्या गजरात तरुणांप्रमाणेच लेझीमच्या तालावर नाचणाऱ्या तरुणी, उधळला जाणारा अमाप गुलाल, उशिरापर्यंत चालणाऱ्या विसर्जन मिरवणुका अशा अनेक प्रकारच्या वैशिष्ट्यांमुळे नंदुरबार येथील गणेश विसर्जन मिरवणुका चर्चेत असतात.

हेही वाचा 

Back to top button