Uddhav Thackeray : शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही : जाणून घ्‍या उद्धव ठाकरे असे का म्‍हणाले? | पुढारी

Uddhav Thackeray : शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही : जाणून घ्‍या उद्धव ठाकरे असे का म्‍हणाले?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  शिंदे गटाने एका पोस्टरवर शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असे लिहिले हाेते, असे सांगत २५ ते ३० वर्षे भाजपसोबत युतीत राहून शिवसेनेची भाजप झाली नाही. तशीच काँग्रेससोबत राहिल्याने शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, अशा शब्‍दांमध्‍ये आज ( दि. १०)  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.  जळगावमध्ये आयोजित वचनपूर्ती सभेत ते बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरे  म्‍हणाले की, तुम्ही इंडिया नाव बदला, आम्ही पंतप्रधान बदलू, असे आव्हान देत भाजपला सत्तेच्‍या माेहातून  पक्षांची फोडाफो इंडिया, भारत, हिंदुस्थान आमचा अभिमान आहे. इंजिन मागून इंजिन लावत आहेत, पण कारभार शून्य आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

भाजपने केवळ चोरीचे काम केले असून बाळासाहेबांना चोरण्याचा प्रयत्न केला आहे. काही लोकांच्या डोक्यात हवा गेली आहे, राज्याचे मुख्यमंत्री केवळ चमकोगिरी करत आहेत, अशा निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता साधला. मणिपूरमध्ये हिंसाचाराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. परंतु देशाचे पंतप्रधान विदेशी पाहुण्यांच्या भेटीत व्यस्त आहेत. सरदार वल्लभभाईंच्या कामाची उंची कधी गाठणार, असा सवाल ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना केला. देवेंद्र फडणवीसांनी भाजप संपवून टाकली, सत्तेत असताना प्रामाणिकपणे काम करून दाखवलं, असेही ते म्‍हणाले,.

राज्यभरात कार्यक्रमांना भाड्याने माणसं आणून गर्दी जमविली जात आहे. मुख्यमंत्र्यांना जी-२० परिषदेला जायला वेळ आहे, परंतु जरांगे-पाटील यांना भेटायला वेळ नाही, अशी टीका ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली. शब्द पडू द्यायचा नाही, अशी बाळासाहेबांची शिकवण आम्हाला असल्याने दिलेला शब्द विसरत नाही. सत्तेत असताना प्रामाणिकपणे काम केले. देवेंद्र फडणवीस यांनी भाजप संपवली, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

जालना लाठीमार म्हणजे जालनाकांड आहे, लाठीमाराची घटना जालियनवाला बाग हत्याकांडासारखी आहे. तुम्ही मैत्री अनुभवली आता मशालीची धग अनुभवा,असा इशारा ठाकरे यांनी भाजपला दिला.

तुम्ही इंडिया नाव बदला, २०२४ ला केंद्रात भाजपला स्थान नाही, पण विजयासाठी भाजपकडून दंगली पेटवल्या जातील. अयोध्योत राममंदिर आणि महाराष्ट्रात आयाराम मंदिर,असा टोलाही भाजपला त्यांनी लगावला. राममंदिराच्या लोकार्पणावेळी देशात दंगली पेटवल्या जाण्याची भीती ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा 

Back to top button