जळगाव : गुलाबराव पाटलांवर अब्रुनुकसानीचा दावा, एकनाथ खडसे झाले न्यायालयात हजर | पुढारी

जळगाव : गुलाबराव पाटलांवर अब्रुनुकसानीचा दावा, एकनाथ खडसे झाले न्यायालयात हजर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप केले होते. याप्रकरणी खडसे यांनी गुलाबराव पाटलांविरुद्ध ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. याच दाव्याच्या प्रकरणात सोमवार (दि.19) आज एकनाथ खडसे यांनी न्यायालयात हजेरी लावली.

राज्याचे ग्रामविकास मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांनी पदाचा दुरुपयोग करून पॉलिहाऊस अनुदान, मुक्ताईनगर साखर कारखाना आणि इतर कृषीविषयक बाबींमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप २०१६ मध्ये केले होते. पाटील यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगून खडसे यांनी जिल्हा न्यायालयात ५ काेटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.

एकनाथ खडसे यांनी लावली हजेरी

या प्रकरणी आज सोमवारी (दि.19) न्यायालयात कामकाज झाले. त्यासाठी खडसे न्यायालयात आले त्यांनी या प्रकरणी खडसेंनी मागील आदेश कायम ठेवून खटला पुढे सुरू ठेवावा अशी विनंती न्यायालयास केली. दरम्यान, गुलाबराव पाटील यांचे नाव दोनवेळा न्यायालयाने पुकारले मात्र मंत्री गुलाबराव पाटील किंवा त्यांचे वकील कोर्टात हजर झाले नाही. या खटल्याची सुनावणी उद्या मंगळवारी (दि.20) पुन्हा होणार आहे.

Back to top button