जळगावात किरकोळ वादातून तरुणाची चॉपरने भोसकून हत्या; गोलाणी मार्केटच्या तळघरात आढळला मृतदेह | पुढारी

जळगावात किरकोळ वादातून तरुणाची चॉपरने भोसकून हत्या; गोलाणी मार्केटच्या तळघरात आढळला मृतदेह

जळगाव : पुढारी वृत्तसेवा 

किरकोळ वादातून ३० वर्षीय तरुणाची चॉपरने भोसकून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील गोलाणी मार्केटमधील तळघरात सोपान गोविंदा हटकर (वय-३०, रा हरीविट्ठल नगर) या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशीला सुरुवात केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ येथे असलेल्या गोलाणी मार्केट मधील तळघरात काही तरुणांमध्ये वाद झाले. या वादातून सोपान गोविंदा हटकर (वय-३०, रा हरीविट्ठल नगर, जळगाव या तरुणाचा चॉपरने वार करून खून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. अज्ञात मारेकरी फरार झाले आहेत.

घटनास्थळी पोलिसांकडून पाहणी

घटनास्थळी चॉपरचे खाली कव्हर मिळून आले आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गावित, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धांडे, अमोल ठाकूर, उमेश भांडारकर, तेजस मराठे, योगेश इंधाटे, रतन गीते यांच्यासह पोलिसाचा ताफा घटनांस्थळी दाखल झाला आहे. दरम्यान खाजगी वाहनातून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button