नाशिक : दारु पिण्यास पैसे न दिल्याने धारदार शस्त्राने वृद्धास मारहाण | पुढारी

नाशिक : दारु पिण्यास पैसे न दिल्याने धारदार शस्त्राने वृद्धास मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दारु पिण्यास पैसे न दिल्याने व उधारीचे पैसे मागितल्याने संशयित बंडु गटकळ याने चांद गुलाब सैय्यद (६३, रा. डीजीपी नगर रोड) यांना मारहाण केल्याची घटना घडली. पंचवटीतील संजय नगर येथे बुधवारी (दि.३०) सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

चांद सैय्यद हे त्यांच्या मित्राकडे जात असताना संशयित बंडूने त्यांच्याकडे दारुसाठी पैसे मागितले. चांद यांनी पैसे देण्यास नकार देत बंडूला उधार दिलेले पैसे मागितले. त्याचा राग आल्याने बंडूने धारदार शस्त्राने चांद यांना दुखापत करून शिवीगाळ केली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात बंडू विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

Back to top button