नाशिक : हिरावाडी येथे युवकाची आत्महत्या | पुढारी

नाशिक : हिरावाडी येथे युवकाची आत्महत्या

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

पंचवटी येथील हिरावाडी परिसरातील २४ वर्षीय युवकाने मनपा उद्यानात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. मोहन सोमनाथ वाटेकर असे या युवकाचे नाव आहे. मोहन याने गुरूवारी (दि. १८) मध्यरात्री गळफास घेतल्याचे समजते. सकाळी काही नागरिक उद्यानात तुळजा भवानी मंदिराजवळ गेले असता त्यांना येथे युवकाने झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button