नाशिक : प्रतीक्षा करुऩही कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या | पुढारी

नाशिक : प्रतीक्षा करुऩही कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

नांदगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा 
नांदगाव तालुक्यातील बाणगांव बु. येथील शेतकरी जनार्दन छगन कवडे(50) या शेतक-याने आत्महत्या केली. बुधवारी (दि. 20) रोजी कुटुंबातील इतर सदस्य शेतावर कामासाठी गेले असल्याची वेळ साधून त्यांनी घरातच गळफास घेतला. या घटनेने बाणगाव पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
जनार्दन कवडे यांचे वडील छगन कवडे यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. त्यांच्या मृत्यूनंतर हे कर्ज फेडण्याची जबाबदारी जनार्दन कवडे व कुटुंबीयांवर आली. शासनाच्या कर्जमाफी योजनेत, आपले कर्ज माफ होईल अशी आशा जनार्दन यांना होती. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत ते होते.  शासनाने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र त्यातील निकषांत ते बसले नाही. परिणामी कर्जमाफी न झाल्याने आता ते कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

Back to top button