नाशिक : अंबोलीत लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त | पुढारी

नाशिक : अंबोलीत लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त

नाशिक : जव्हार-नाशिक रोडवरील अंबोली चेकपोस्ट येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून अवैध मद्य वाहतूक करणार्‍या दोघांना पकडले आहे. त्यांच्याकडून पथकाने वाहनासह 11 लाख 31 हजार 330 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.

जव्हार-नाशिक मार्गावरून अवैध मद्य वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकास मिळाली होती. त्यात एमएच 04, एएक्स 6420 वाहनाची तपासणी केली असता त्यात योगेश्वर ऊर्फ योगला नथूभाई पटेल (31) व सुभाष विकीभाई नलिसा (27, रा. बलसाड, राज्य गुजरात) हे दोघे आढळून आले. त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्या कारमध्ये विदेशी मद्याच्या सुमारे सव्वातीन लाख रुपयांचे मद्य आढळून आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. एस. देशमुख, प्रवीण ठाकूर, एम. आर. तेलंगे, एच. एस. नेहेरे, जवान विजेंद्र चव्हाण, विष्णू सानप, रमाकांत मुंढे, गोकुळ परदेशी या पथकाने कारवाई केली.

हेही वाचा :

Back to top button