नाशिकच्या विंचूर येथे पोलिसाच्या घरावरच चोरट्यांचा डल्ला, १४ तोळे सोने लंपास | पुढारी

नाशिकच्या विंचूर येथे पोलिसाच्या घरावरच चोरट्यांचा डल्ला, १४ तोळे सोने लंपास

नाशिक (लासलगाव) वार्ताहर :
विंचूर येथे पोलिसाच्या घरी सोमवारी (ता. ६) मध्यरात्री चोरट्यांनी तीन लाख ६५ हजारांचे सोने चोरी केले असून, या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
येथील पोलिस दीपक तुळशीराम निकाळे नाशिक मुख्यालयात कामावर होते. त्यांच्या पत्नी गावी गेल्या असल्याने त्यांचा मुलगा घरी एकटाच होता. मुलगा खालच्या खोलीला कुलूप लावून वरच्या खोलीत झोपलेला असताना सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.
कपाटाचा दरवाजा लोखंडी सळईच्या सहाय्याने वाकवून कपाटातील अंदाजे तीन लाख ६५ हजार किमतीचे १४ तोळे सोने घेऊन चोर फरार झाले. सकाळी निकाळे यांचा मुलगा झोपेतून उठल्यावर चोरी झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, हवालदार योगेश शिंदे, कैलास मानकर यांनी चोरीची माहिती घेऊन पंचनामा केला. त्यानंतर ठसेतज्ज्ञांना बोलविण्यात आले. लासलगाव पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button