नाशिक : ज्ञानेश्वर म्हस्के ठरला बलकवडे चषकाचा मानकरी | पुढारी

नाशिक : ज्ञानेश्वर म्हस्के ठरला बलकवडे चषकाचा मानकरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय दिल्ली मान्यताप्राप्त इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन व महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशन संलग्न नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्याने शिवछत्रपती पुरस्कारविजेते अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे यांच्या वतीने बलकवडे व्यायामशाळा व आंतरराष्ट्रीय क्रीडा केंद्र, भगूर आयोजित ‘स्वातंत्र्य श्री’2022, ‘बलकवडे चषक’2022 चा मान नाशिकरोडच्या ज्ञानेश्वर म्हस्के याने पटकावला, तर उपविजेता अजय निशाद व बेस्ट पोझरचा मान आकाश झाकणे यांनी मिळवला. मोस्ट इम्प्रूव्हड बॉडीबिल्डर अक्षय खापरे याला देण्यात आला.

स्पर्धेचे उद्घाटन सेवानिवृत्त उपअधीक्षक रमेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अ‍ॅड. विशाल बलकवडे, महेंद्र काळे, जिल्हा संघटनेचे सरचिटणीस गोपाळ गायकवाड, गोविंद काळे, विजय गामणे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत नाशिक जिल्हा भरातील विविध गटांमध्ये एकूण 53 शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे पंच म्हणून गोपाळ गायकवाड, रवींद्र वर्पे, श्रीराम जाधव, दिनेश भालेराव, अमोल जाधव, अमन शेख यांनी कामकाज पाहिले. प्रशांत कापसे यांनी सूत्रसंचालन, स्टेज मार्शल सचिन लहामगे, विशाल डांगळे यांनी कामकाज पाहिले. विजेत्यांना अ‍ॅड. बलकवडे, कृष्णा नागपुरे, गोविंद काळे, संजय गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी चेतक बलकवडे, राहुल कापसे, विकास मोरे, संतोष हेबाळे, अक्षय यंदे आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा:

Back to top button