नाशिक : घर भाडेतत्त्वाने घेण्याच्या बहाण्याने एक लाखाचा ऑनलाइन गंडा | पुढारी

नाशिक : घर भाडेतत्त्वाने घेण्याच्या बहाण्याने एक लाखाचा ऑनलाइन गंडा

नाशिक : घर भाडेतत्त्वाने घेण्याच्या बहाण्याने डिपॉझिट देण्यासाठी घरमालकाकडून बँक खात्याची माहिती मागवून भामट्याने सुमारे एक लाख रुपये ऑनलाइनरीत्या काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी राजकुमार यादव (रा. देवळाली कॅम्प) यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. यादव यांना मनजित नामक भामट्याने 28 ते 31 मे दरम्यान गंडा घातला. यादव यांच्या फिर्यादीनुसार संशयित मनजित याने यादव यांना फोन करून तुमचा फ्लॅट भाडेतत्त्वाने घ्यायचा आहे असे सांगितले. फ्लॅटचे डिपॉझिट ऑनलाइन देतो, असे सांगून भामट्याने यादव यांच्याकडून पत्नीच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर यादव यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून परस्पर 99 हजार 998 रुपये काढून घेत गंडा घातला.

हेही वाचा :

Back to top button