नाशिक : …अखेर मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांना अटक | पुढारी

नाशिक : ...अखेर मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांना अटक

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांना आज सकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने त्र्यंबकेश्वर येथून अटक केली असून त्यांना भद्रकाली पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. मनसेच्या मशिदींवरील भोंग्याविरोधात झालेल्या आंदोलनाच्या दिवसापासून मनसेना जिल्हाध्यक्ष अंकुश पवार व शहराध्यक्ष दिलीप दातीर हे दोघेही नॉटरिचेबल होते.

दरम्यान, शनिवारी मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना युनीट दोनच्या पथकाने पाथर्डी फाटा येथील स्काय क्लार्क हॉटेलमधून अटक केली. सहाय्यक आयुक्त सोहेल शेख यांनी दातीर यांची 18 मे पर्यंत तडीपारीची नोटीस काढली. आज (दि. 9) जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनाही अंजनेरी येथून अटक करण्यात आली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button