नाशिक : विष सेवन केलेल्या वृद्धाचा मृत्यू | पुढारी

नाशिक : विष सेवन केलेल्या वृद्धाचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; संत कबीर नगर परिसरात ६५ वर्षीय वृद्धने विष सेवन केल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रामभाऊ केरुबा आठवणे असे या वृद्धाचे नाव आहे. गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामभाऊ यांनी राहत्या घरात विष सेवन केल्याने त्यांना परिसरातील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

 

Back to top button