नाशिक : दुकानात लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू | पुढारी

नाशिक : दुकानात लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू

नाशिक : दुकानात लागलेल्या आगीत जळालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. उषा मोहन परदेशी (48, रा. देवळाली कॅम्प) असे या महिलेचे नाव आहे.

कॅन्टोन्मेंट रुग्णालयासमोरील दुकानात आग लागल्याने उषा या गंभीररीत्या भाजल्या होत्या. त्यांना तातडीने कॅन्टोन्मेंट व तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button