नाशिक : वाइन शॉपमधील नोकरांनी केला 40 लाखांचा अपहार | पुढारी

नाशिक : वाइन शॉपमधील नोकरांनी केला 40 लाखांचा अपहार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा : येथील सिन्नर फाटा परिसरात असलेल्या हिरा वाइन शॉप या ठिकाणी असलेल्या दोघा जणांनी संगणकात फेरफार करून सुमारे 40 लाख आठ हजार 483 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार घडला असून, या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण प्रीतमदास सुखवानी यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जुलै 2018 ते 2020 या कालावधीत हा अपहार केल्याचा प्रकार घडला असून, कर्मचारी अविनाश अनिल खैरनार (रा. म्हसरूळ) व मुसा अब्दुल शेख (रा. एकलहरे रोड) यांनी संगनमत करून सुमारे ४० लाख आठ हजार 483 रुपयांचा अपहार केला. अविनाश याने आई अनिता अनिल खैरनार यांच्या नावावरील गृहकर्जाचे हप्ते मुदतपूर्व वेळेत भरणा केल्याचे उघडकीस झाले आहे. त्यानुसार त्यांनी अविनाश खैरनार, मुसा शेख व अनिता खैरनार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button