शरद पवारांचा गद्दारांविरुद्धचा एल्गार नाशिकच्या येवल्यातून होणार, तारीखही ठरली… | पुढारी

शरद पवारांचा गद्दारांविरुद्धचा एल्गार नाशिकच्या येवल्यातून होणार, तारीखही ठरली...

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षातील फुटीर व गद्दार नेत्यांच्या विरोधातील पहिली सभा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात (दि. 8) जुलै रोजी घेण्याचे ठरवले असल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

येवला-लासलगाव मतदार संघ हा छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. शरद पवारांनी येवला मतदारसंघातून छगन भुजबळांना संधी देऊन त्यांचे पुनर्वसन केलं. मात्र, तेच भुजबळ आता अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे याच मतदारसंघातून शरद पवारांनी महाराष्ट्रातील पहिली सभा घ्यायचे ठरवले आहे.

येवल्यातील राष्ट्रवादीचे जुने नेते अॅड. माणिकराव शिंदे यांनी रात्री उशिरा शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळेस झालेल्या चर्चेत शरद पवार यांनी येवला येथून महाराष्ट्रातील सभेला सुरुवात करण्याचे ठरवल्याची माहिती मिळत आहे. अॅड. माणिकराव शिंदे हे भुजबळांमुळे पक्षातून बाहेर ठेवले गेले होते, राष्ट्रवादीतून बाहेर काढल्यावरही अॅड शिंदे यांनी इतर कोणत्याही पक्षाशी घरोबा न करता पवारांशी एकनिष्ठ राहिले होते. या सभेची तयारी त्यांच्याकडून जोरदार प्रयत्नाने सुरू आहे.

येवल्यातील राष्ट्रवादीचे जुने नेते अॅड. माणिकराव शिंदे यांनी रात्री उशिरा शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली.

हेही वाचा : 

Back to top button