सहकारी संस्थेची तिजोरी लंपास करणाऱ्या दोघांना ठाणे, वर्ध्यातून अटक - पुढारी

सहकारी संस्थेची तिजोरी लंपास करणाऱ्या दोघांना ठाणे, वर्ध्यातून अटक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शहरातील विसनजीनगरातील जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयातील अडीच लाखांच्या तिजोरी वर चोरट्यांनी डल्ला मारला. या टोळीतील सूत्रधार दोघांना ठाणे आणि वर्ध्यातून जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात वर्धा येथून ताब्यात घेतलेल्या एकाला न्यायालीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे,

शहरातील जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयात अज्ञान  टोळीने कार्यालयात झोपलेल्या एकाला धमकावून संस्थेची तिजोरी उचलून नेली होती. यानंतर तिजोरीसह २ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा गुन्हा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. तेव्हापासून पोलीस या टोळीच्या मागावर होते.

जिल्हा पेठ पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पो. काँ. समाधान पाटील, विकास पहुरकर, पो. ना. सलीम तडवी यांच्या पथकाने ठाण्यात सापळा रचला आणि शिवासिंग विरसिंग दुधाणी (वय २८, रा. साईकृपा नगर, आंबेवली, कल्याण जि. ठाणे) याला ताब्यात घेतले.

कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शिवासिंगला अटक केली आहे. त्याच्याकडे  तपास केला असता या गुन्हात आणखी काही जणाचा हात असल्याचे निष्पन झाले आहे. यानंतर वर्धा येथून विर मंगलसिंग उर्फ डॉनसिंग मायासिंग दुधाणी ( वय ४५ रा. नांदेड) याला अटक केली. विर दुधाणी याला न्यायालयात हजर केले असता याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

याच्या विरोधात दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक घनश्याम पंडित सोनार (रा. तुळजाईनगर, कुसुबा, जळगाव) यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तसेच या आरोपीवर वर्धा ,यवतमाळ, भंडारा, जळगाव व ठाणे येथे दरोड्यांचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button