बोरगल येथे चार मुलींना विष पाजून निवृत्त जवानाची आत्महत्या | पुढारी

बोरगल येथे चार मुलींना विष पाजून निवृत्त जवानाची आत्महत्या

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

चार मुलींना विष पाजून निवृत्त जवानाने आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना बोरगल (ता. हुक्केरी, कर्नाटक) येथे घडली. बोरगल येथील घटनेची नोंद संकेश्वर पोलिस ठाण्यात झाली आहे. मृतांमध्ये निवृत्त जवान गोपाळ हादीमनी (वय 46), त्‍यांच्‍या मुली  सौम्या (19), श्वेता (16), साक्षी (12), सृजन (10) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ हादीमनी यांच्या पत्नीचे ब्लॅक फंगसमुळे 6 जुलै रोजी निधन झाले होते. यामुळे ते मानसिकरित्या खचले होता. या नैराश्यातूनच त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. संकेश्वर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Back to top button