Best 5 Electric Bikes यंदाच्या दिवाळीत तुम्ही इलेक्ट्रीक बाईक घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. ५० हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या ५ इलेक्ट्रीक बाईक्सची तुम्हाला आम्ही माहिती देणार आहोत. भारतीय बाजारात सध्या इलेक्ट्रीक बाईक्सला पसंती मिळत आहे. या बाईक्सची विक्री भारतात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. तुमचा रोजचा प्रवास मोठा नसेल तुम्ही फक्त गावातल्या गावात अथवा शहरात किरकोळ बाबीसाठी बाईक वापरणार असाल तर या बाईक्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.
५० हजारांच्या दरम्यान येणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीत Ampere V48 चे नाव अग्रस्थानी आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ३९,९९० रुपयांपासून सुरू होते. ही स्कूटर एका चार्जमध्ये जास्तीत जास्त ६० किमी अंतर जाते. कंपनीच्या मते, पूर्ण चार्ज करण्यासाठी ८ तास लागतात. ग्राहकांची निवड लक्षात घेऊन ही इलेक्ट्रीक बाईक बाजारात लाल, निळा आणि जांभळ्या रंगात तुम्हाला उपलब्ध असेल. ही स्कूटर जास्तीत जास्त २५Kmph च्या वेगाने धावू शकते. यात ४८V बॅटरी आणि २५०W मोटर आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश एलएक्स (VRLA) ची एक्स-शोरूम किंमत ४६६४० रुपये आहे. कंपनीने ही स्कूटर लाल आणि पांढऱ्या अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केली आहे. या स्कूटरचे टॉप स्पीड २५Kmph आहे, एका चार्जमध्ये ५०Km पर्यंत चालवता येते. कंपनीच्या मते, स्कूटर पूर्ण चार्ज होण्यासाठी ८ ते १० तास लागतात. यात २५०W पेक्षा कमी शक्तीची मोटर आणि ४८V ची बॅटरी आहे.
देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक हिरोने इलेक्ट्रिक ऑप्टिमा एलएक्स (व्हीआरएलए) स्कूटर बाजारात आणली आहे. दिल्लीत त्याची एक्स-शोरूम किंमत ५१४४० रुपये आहे. ही बाईक पांढरा, निळा आणि ग्रे या तीन रंगांमध्ये खरेदी उपलब्ध आहे. ही स्कूटर फक्त २५Kmph च्या टॉप स्पीडवर चालवता येते. कंपनीच्या मते, स्कूटर पूर्ण चार्ज होण्यासाठी ८ ते १० तास लागतात. यात २५०W पेक्षा कमी शक्तीची मोटर आणि ४८V ची बॅटरी आहे.
कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर शोधणाऱ्यांसाठी Ampere Reo Plus New ही पहिली पसंती असू शकते. ही स्कूटर लीड ॲसिड बॅटरी प्रकाराची एक्स-शोरूम किंमत ४५५२० रुपये आहे. स्कूटर एका चार्जमध्ये ६५ किमी पर्यंत चालवता येते. पूर्ण चार्ज होण्यासाठी ६ तास लागतात. त्याचा जास्तीत जास्त वेग २५Kmph आहे. स्कूटरमध्ये ४८V बॅटरी आणि २५०W मोटर आहे.
Lohia Oma Star च्या वेबसाईटवर त्याची किंमत देण्यात आलेली नाही, पण मिळालेल्या माहितीनुसार, ही स्कूटर ४५,३६८ रुपयांपर्यंत मिळू शकते. याचे टॉप स्पीड २५Kmph आहे. ही बाईक एका चार्जवर ६०Km पर्यंत प्रवास करू शकते. यात २५०W पेक्षा कमी BLDC मोटर आहे. शक्ती देण्यासाठी, स्कूटरमध्ये ४८V बॅटरी उपलब्ध आहे. स्कूटरमध्ये डिजिटल डिस्प्ले आणि टेलिस्कोप फोर्कसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.