नाना पटोले म्हणाले, ‘जशास तसे उत्तर देणार’ | पुढारी

नाना पटोले म्हणाले, 'जशास तसे उत्तर देणार'

पुणे; पुढारी वृत्तसेवा: लोकांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार विराेधकांच्‍या खोट्या चौकशा लावून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्यांना जशास तसे उत्तर देणार असल्याचे महाविकास आघाडीने ठरविले आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात आज (दि.२३) पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी  पटोले म्हणाले की,’भाजपने गेल्या सात वर्षात देशाला पन्नास वर्षे मागे नेले आहे. कोरोना साथीच्या काळात अनेकांचे मृत्यू झाले. मात्र, भाजप सरकार लसीकरणाचे सेलिब्रेशन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मृत्यूचे तांडव होत असताना असा सोहळा करणे हे दुर्भाग्य आहे. यामुळे देश आर्थिकदृष्ट्या कमजोर झाला आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्नामुळे देश ५० वर्षे मागे गेला आहे . मात्र, या देशांतर्गत प्रश्नावर केंद्रातील भाजप सरकारला काहीही देणे घेणे नाही.’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल जशास तसे उत्तर दिले असल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले. साखर कारखाने भाजपचा लोकांनीही घेतले आहेत. त्यामुळे भाजपचे नेते कोणावर आरोप करीत आहेत ते कळले पाहिजे , असा सवालही त्‍यांनी केला. आम्ही जशास तसे उत्तर देणार असे म्हटले. काँग्रेस सर्वांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे. महापालिका निवडणुकीत पुण्यात काँग्रेसमध्ये गटबाजी दिसणार नाही, असा विश्‍वासही पटाेले यांनी व्‍यक्‍त केला.

हेही वाचलं का? 

 

पाहा व्हिडिओ : मुंबईच्या रेल्वे डब्यामध्ये सुरू झाले रेस्टॉरंट

Back to top button