आमदार व तत्कालिन पालकमंत्र्यांकडून क्रीडा संकुलाचे वाटोळे : उदयनराजे | पुढारी

आमदार व तत्कालिन पालकमंत्र्यांकडून क्रीडा संकुलाचे वाटोळे : उदयनराजे

सातारा ; पुढारी वृत्तसेवा :

मी जिल्हा क्रीडा संकुलाला कारण नसताना विरोध करतो, असं दाखवणार्‍या व क्रीडा संकुलांचे वाटोळे करणार्‍या आमदार व  तत्कालिन पालकमंत्र्यांना धारेवर धरले पाहिजे होते. हे कोणी केलं हे सगळ्यांना माहित आहे, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून सातार्‍यात पत्रकारांशी बोलताना केली.

टेंडर हे स्टेडियमचे काढले आणि दुकान गाळे बांधले

शासकीय विश्रामगृह येथे बोलताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले, आता जे काही आमदार, खासदार, पदाधिकारी आहेत त्यांनी या सगळ्यातून बोध घ्यावा. क्रीडा संकुलाचे सगळं वाटोळे करून टाकलं आहे. त्यावेळी जे पालकमंत्री होते त्यांनी उत्तर द्यावे. प्रत्येकवेळी मी नाही, मी नाही, मी काय केलंय, असे म्हणायचे. यांना ऐन मोक्याची जागा कशी मिळणार? आपण काय व्यापारी संकुलांचे टेंडर काढले नव्हते. टेंडर हे स्टेडियमचे काढले आणि दुकान गाळे बांधले असल्याचा आरोप खा. उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांच्यावर केला.

संपूर्ण सातार्‍याला झिरो करायचे ठरवले आहे

अ‍ॅथलेटिकसाठी राऊंड लागत नाही. आताचे जे काही ट्रॅक आहेत ते नक्की बसतात का? त्याला अबलॉन लागतं, तिथे राऊंडच आहे. साधे तुम्ही रणजी ट्रॉफीच्या मॅच घेवू शकत नाही, तुम्ही अ‍ॅथलेटिकचा इव्हेंन्ट घेवू शकत नाही. अ‍ॅथलेटिक स्पर्धेसाठी राउंड लागत नाही. यांनी संपूर्ण सातार्‍याला झिरो करायचे ठरवले आहे. पेट्रोल पंपासाईटचा भाग तोडून अबलॉन करता आलं तर ते बघा. स्विमिंग पूल वॉटरप्रुफींग करून तो कसा सुरू होईल हे बघितलं पाहिजे.

खा. उदयनराजे पुढे म्हणाले, सेंट्रल फंडाच्या माध्यमातून मला सूचवा, स्टेट, सेंट्रलला बर्‍याच स्किम असून तुम्ही मला प्रपोजल द्या. मी फंड आणतो. पूर्वी आपण रणजी ट्रॉफीच्या मॅचेस घेवू शकत होतो व त्या झाल्याही आहेत. सातारा क्रीडा संकुल बसस्थानकाच्या शेजारी आहे. ज्या बी. जी. शेळकेंनी संपूर्ण बालेवाडीचे स्टेडिअम कॉमन अ‍ॅमनिटी स्पेसच्यानुसार स्पोर्ट कॉम्प्लेक्स बांधले त्यावेळी त्यांनी टेंडरसाठी अ‍ॅप्लाय केले होते.

सातारा एमआयडीसीलगतच्या ग्रामीण भागात नव्याने हद्दवाढ झाली आहे. जरी तो भाग आपल्या हद्दवाढीच्या बाहेर असेल तरी त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी स्पोर्ट कॉम्प्लेक्स तयार करूया. मी 2 ते 3 दिवस त्या परिसराची पाहणी केली आहे. कॉमन अ‍ॅमनिटी स्पेसच्यानुसार स्पोर्ट कॉम्प्लेक्स तयार करू. तेथे शहर व परिसरातील लोक जावू शकतात. त्या ठिकाणी जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी स्वत:च्याच नावावर जागा केल्या आहेत असे निदर्शनास आले असल्याचेही खा. उदयनराजे म्हणाले.

हेही वाचलं का ?

Back to top button